नाभिक समाज विकास मंडळातर्फे संतसेना महाराज पुण्यतिथी उत्सव!

ऑगस्ट 24, 2022 3:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । शहरातील नाभिक समाज विकास मंडळातर्फे अशोक नगर, अयोध्या नगरात श्री.विठ्ठल सख्मीणीसह श्री.संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त दिंडी, भजन व किर्तनसह पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सचिन नारळे, प्रतापराव पाटील, जि.प. सदस्य पियुष कोल्हे, बंटी नेरपगार, जिल्हाध्यक्ष सुनिल खडके नारोचक, डॉ. विरन खडके, नगरसेवक अभिषेक पाटील, संगिताताई गवळी, मनोहर खोडे, तालुकाध्यक्ष दिलीप जगताप हे होते.

jalgoan 12

श्री.संतसेना महाराज मंदिरात दिप प्रज्वलन व महाआरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. किर्तन आयोजन ह.भ.प.श्री. गजानन महाराज आमोदेकर यांचे परदमुखाने पार पडले. तसेच भव्य-दिव्य सोळाव उभारणी कामी सढळ हाताने देणगीदार यांचा सन्मानाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर भागवत एकादशी निमित्त महाप्रसाद १ किंटल फराळाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी नाभिक विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगदिश वाघ, उपाध्यक्ष राम जगताप, संचालक अरुण बोरसे, भिकन बोरसे, उदय पवार, कमलेश निकम, डिगंबर महाले, मुरतीधर कुंवर, पांडुरंग प्रभाकर वारूळे, प्रकाश अण्णा निकम, मधुकर निकम, राहुल सुर्यवंशी, विकास बोरसे, एकनाथ सोनवणे, विशाल निकम, विकास फुलपगारे, उमेश वाघ, रविंद्र महाले, सुरेश सोनगिरे, रवि महाले, सचिन सोनवणे, युवराज बोरसे, तुळशिराम जगताप, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, मधुकर रोडे, हिरामण सोनवणे, दिलीप श्रीखंडे, गजानन ठाकरे, संदिप बसाने, राजेंद्र वाघ, प्रमोद अहिरे, मयुर ठाकरे, दिलीप खोंडे, मयुर सोनवणे, हेमंत सोनगिरे, हितेश वाचेले, बस्तीराम बोरसे, पंकज पवार, मोहन पवार, गणेश झारखंडे, संजय झारखंडे, पंकज सोनवणे, शैलेंद्र वाघ, विक्की झुंजारराव, अश्विन मोरे, प्रविण बाळा जगताप, गणेश अहिरे यांनी सहकार्य केले. सुत्रसंचलन चंद्रकांत सोनगिरे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्तावीक जगदिश वाघ यांनी तर आभार प्रदर्शन श. अध्यक्ष भिकन बोरसे, श. कार्याध्यक्ष उदय पवार यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now