मुक्ताईनगरमध्ये भाजपला धक्का ; आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या संजना पाटील विजयी

डिसेंबर 21, 2025 1:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२५ । मुक्ताईनगर नगरपरिषद मध्ये भाजपला धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरलेल्या शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या संजना पाटील 2583 मतांनी विजयी झाली आहे.

sanjana patil

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाले होते. यात मुक्ताईनगरमध्ये महायुतीत बिघाडी दिसून आली होती. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भाजपने स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. तर दुसरीकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे पॅनल स्वतंत्र उभे करत कन्या संजना पाटील हिला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. शिवसेनेतर्फे संजना पाटील हिला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या निवडणुकीच्या निकालात नगराध्यक्षपदी संजना पाटील हिने 2583 मतांनी विजय मिळवीत भाजपला धक्का दिला. १० जागा शिंवसेना शिंदे गटाने जिकल्या आहेत. भाजपला केवळ ४ जागांवर विजय मिळविता आला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील भाजप पक्षाला मोठा पाठिंबा दिला असल्याने या ठिकाणी एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे अर्थात खडसे परिवाराचा मोठा पराभव मानला जात आहे.

प्रभाग क्रमांक 1 गणेश टोंगे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 2 नईम बागवान बीजेपी विजयी
प्रभाग क्रमांक 3 नुसरत बी खान अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक 4 हाशमशः अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक 5 नासिमाबी खान शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 6 प्रीती वानखेडे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 7 सोनवणे अंजनाबाई सुपडू शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 8 साधना हरिश्चंद्र ससाने भाजपा विजयी
प्रभाग क्रमांक 9 सलमाबी मुशीर मणियार अपक्ष विजयी
प्रभाग क्रमांक द10 ताहेराबी लूकमान शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 11 मस्तान कुरेशी शिवसेना विजयी
मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 12 माधुरी सचिन पाटील भारतीय जनता पार्टी विजयी
प्रभाग क्रमांक 13 बबलू उर्फ संतोष कोळी शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 14 प्रमोद भारंबे शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 15 सविता भलभले शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 16 देवयानी शिरसाठ शिवसेना विजयी
प्रभाग क्रमांक 17 अनुसयाबाई चिंचोले बीजेपी विजयी

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now