खुशखबर! साईनगर शिर्डी-बिकानेर एक्स्प्रेसच्या कालावधीत वाढ

नोव्हेंबर 29, 2025 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२५ । रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. भुसावळ मार्गे धावणाऱ्या साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उत्तर भारतातील राजस्थानकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

train

गाडी क्र. ०४७१६ साईनगर शिर्डी ते बिकानेर साप्ताहिक विशेष गाडीला २८ डिसेंबर २०२५ पर्यंत, तर गाडी क्र. ०४७१५ -बिकानेर ते साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडीला २७ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या स्थानकांवर आहेत थांबा
मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाल, उज्जैन, नागदा, शामगड, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, दहेर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगड, फतेहपूर शेखावाटी, चूरू, रतनगड, राजलदेसर आणि डुंगरगड या ठिकाणी थांबे असतील, असे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

दरम्यान, राजस्थानमधील खाटु श्याम दर्शनाला जाण्यासाठी भुसावळ मार्गे या गाडीचा लाभ होत आहे. शिर्डी ते बिकानेर ही गाडी दर रविवार रात्री ११ वाजून ४० मिनिटाने भुसावळला पोहोचते. यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री १० वाजून ८ मिनिटाने रिंगस येथे पोहोचते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now