⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

…तोपर्यंत संप मागे नाही; एस.टी. कर्मचाऱ्यांचा निर्धार

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । जोपर्यंत एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका एरंडोल आगाराच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

एरंडोल आगारातील एस.टी. कर्मचाऱ्यांकडून रविवार दि.७ पासून संप पुकारण्यात आला आहे. संपात सर्व चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाचा दि.११ रोजी तिसरा दिवस असून संप सुरु झाल्यापासून एकही बस मार्गस्थ झालेली नाही. अचानक सुरू झालेल्या या संपामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या साऱ्या गोष्टीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरणं झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची प्रतिक्रिया देखील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. हा संप फक्त कर्मचारी यांनी केलेला असून कोणत्याही संघटनेचा या संपाशी संबंध नसल्याची माहिती यावेळी संपात सामील कर्मचाऱ्यांनी दिली. दरम्यान, या संपाला विविध राजकीय पक्षांनी पाठींबा दिला जाहीर केला आहे.