जळगाव जिल्हापाचोरा

पाचोऱ्यात दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । पाचोरा शहारत राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विविध मागण्यांना साठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात स्वातंत्र शिधा पत्रिका ( शासन परिपत्रक क्र.baithak 2020 / प्र. क 19/ नापु 28), शासन नियमानुसार घरकुल मिळावे, शासन नियमानुसार 35 किलो धान्य मिळावे, ग्रामपंचायत 5% निधी मिळावी, (शासन निर्णय क्रमांक जि.प.उ 2018 प्र.क 54/ वित्त -3) अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे संचालक विकास लोहार, डॉ.निळकंठ पाटील, संगीता हटकर, भारत वाघे, रवींद्र दिलीप, सुनील लोहार, बडगुजर व दशरथ भडांगे उपस्थित होते.

दरम्यान, नायब तहसीलदार संभाजी पाटील यांनी पुढील सोमवारी पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच गट विकास अधिकारी यांची संयुक्त बैठक करून बाकी समस्या सोडवणे सांगितले. तर पुरवठा अधिकारी अभिजित येवले यांनी सोमवार रोजी राशन कार्ड देणार आणि पुढील ६० दिवसात अंत्योदय लाभ ३५ किलो धान्य देणार असल्याचे आश्वासन दिले.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button