⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

भोळे महाविद्यालयाच्या खेळाडू मनीष निकम याचा सत्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील विद्यार्थी कबड्डी खेळाडू मनीष निकम याने आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याची कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी जळगाव विभाग कबड्डी संघात निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्याचा सत्कार माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी क्रीडा समिती सदस्य प्रा.एस.डी.चौधरी, डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.ए.आर.सावळे, प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते. आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत भोळे महाविद्यालयाने पीजी यूजी जिमखाना विद्यापीठ जळगाव संघाचा 42-29 पराभव करून 13 गुणांनी विजय मिळवला तसेच केसीई आयएमआर, जळगाव संघाचा 46-37 ने पराभव करून 09 गुणांनी विजय संपादन केला. सेमीफायनलमध्ये एम.जे.महाविद्यालय, जळगाव यांच्याशी व तृतीय स्थानासाठी नाहाटा महाविद्यालय, भुसावळ यांच्याशी सामना चुरशीचा होऊन भोळे महाविद्यालयास चतुर्थ स्थान मिळाले तसेच विद्यापीठ आंतर विभागीय कबड्डी स्पर्धेत मनीष निकम, जळगाव विभागाकडून खेळत जळगाव विभागाने विजय संपादन केला. याबद्दल सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. त्यास प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.