⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

धान्यांची परस्पर विल्हेवाट प्रकरणी परवाना रद्द; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे चिखली येथील स्वस्त धान्य दुकानदाराने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील धान्य साठा पात्र लाभार्थ्यांना वाटप न करता परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला असुन स्वस्त धान्य दुकानदार अजाबराव पाटील यांच्या विरोधात पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन २०२० या कालावधीत मोफत धान्य वितरीत करण्यात आले होते. पुरवठा अधिकारी यांनी दप्तर तपासणी केली असता दुकानदारास पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी ७०.७१ क्विंटल गहु व ३६.७६ क्विंटल तांदूळ आणि ८.६९ क्विंटल दाळ यांची परस्पर विल्हेवाट लावुन शासनाची फसवणुक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक ॠषीकेश गावंडे यांच्या फिर्यादीवरून रेशनदुकानदार अजाबराव पाटील यांच्या विरोधात भांदवी कलम ४२०,४०९,४०६ अत्यावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ व ७ नुसार गुन्हा नोंद आहे.

याबाबत ३१ लाभार्थ्यांचे जाब जबाब पुरवठा विभागाने घेतले होते. तसेच यापुर्वीही असा प्रकार घडला होता का? याबबतही चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.

हे देखील वाचा :