⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

बोदवडला प्रशासनाची आढावा बैठक.. ॲड. खडसेंनी मांडले जनसंवाद यात्रेतील प्रश्न!

Bodawad News-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । बोदवड तालुका प्रशासनाची आढावा बैठक माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार जितेंद्र कुंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय बोदवड येथे घेण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार सूर्यवंशी बिडीओ हेमंतकुमार काथेपुरम, पोलिस निरीक्षक गुंजाळ, तालुका कृषी अधिकारी पाडवी, राज्य परिवहन विभागाचे सोनवणे, शिक्षणाधिकारी लहासे, विद्युत वितरण विभागाचे झोपे, यांच्यासह इतर शासकीय प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी जनसंवाद यात्रे दरम्यान रोहिणी खडसे यांच्याकडे तालुक्यातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या होत्या. रोहिणी खडसे यांनी त्या समस्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडून त्यातील बहुतांशी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. एकनाथराव खडसे यांनी महसुल ,विद्युत वितरण, परिवहन, कृषी, पोलिस, आरोग्य, पंचायत समिती, पशु संवर्धन, सार्वजनिक बांधकाम व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांकडून काम काजाचा आढावा घेतला.

यामध्ये महसुल विभागाकडून श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार अर्थ साहाय्य योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ सेवा योजना इतर योजनांच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच या योजनांच्या तालुका स्तरीय समितीची बैठक होण्यास तांत्रिक कारणाने विलंब होतो आहे. तरी तहसीलदार यांनी त्यांच्या अधिकारात या योजनांच्या लाभार्थ्यांच्या प्रकरणांना लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी अशा सूचना एकनाथराव खडसे यांनी केल्या.

तालुक्यात नवीन रेशन कार्ड, धान्य वाटप संबंधी एकनाथराव खडसे यांनी आढावा घेतला. रेशन कार्ड वाटप झाले असून ऑनलाइन झाले नसल्याने धान्य मिळत नाही अशी, नागरिकांची ओरड आहे. त्यावर तात्काळ उपाय योजना करण्यासंबंधी एकनाथराव खडसे यांनी सूचना केल्या. दरम्यान बोदवड तालुक्यासाठी ३ हजार इष्टांक वाढवून देण्या विषयी बैठकीतून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबत एकनाथराव खडसे यांनी दूरध्वनी वरून चर्चा केली.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले लवकर मिळावे यासाठी व्यवस्था करण्या संबंधी एकनाथराव खडसे यांनी प्रशासनाला सूचना केल्या. पोलीस निरीक्षक गुंजाळ यांच्या कडून तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून चोरीच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसेल यासाठी उपाययोजना कराव्या व रात्रीचे गस्तीचे प्रमाण वाढवावे अशा सूचना केल्या. त्याच बरोबर तालुक्यात अवैध दारू विक्री, सट्टा मटक्याचे प्रमाण वाढले आहेत्यावर कारवाई करणे बाबत एकनाथराव खडसे यांनी पोलीस निरीक्षकांना सूचना केल्या.

विद्युत वितरण विभागाचा आढावा घेताना ज्या शेतकरी बांधवांनी नविन कनेक्शन साठी डिमांड नोट भरली आहे त्यांना तात्काळ कनेक्शन करून द्यावे, शेती कनेक्शन साठी लवकरात लवकर डी पी उपलब्ध करून द्याव्यात. चिचखेडा प्र बो येथील भिल्ल वस्तीत विज पुरवठ्याची व्यवस्था करावी. साळशिंगी पाणी पुरवठ्या वर पुर्ण वेळ विद्युत पुरवठ्याची सोय करावी. मुक्तळ सब डिव्हिजन मध्ये कमी दाबाने विद्युत पुरवठा होतो त्यावर उपाययोजना करावी.

हिंगणे येथील जीर्ण पोल बदलावावे, नविन पोल, ट्रान्सफार्मर साठी जिल्हा नियोजन समिती कडे प्रस्ताव पाठविण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. एकनाथराव खडसे यांनी पशु वैद्यकीय विभागाचा साखरे यांच्या कडून आढावा घेतला. लंपी रोगाने किती जनावरे बाधित आहेत. लंपीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा एकनाथराव खडसे यांनी आढावा घेतला.बाधित जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यांचा लवकरात लवकर पंचनामा ,शवविच्छेदन करून मृत शरीराची विल्हेवाट लावण्या बाबत सुचना केल्या तालुक्यात लंपी रोगावर पशु पदविकाधारक सेवा देत आहेत त्यांना शासकीय सेवेत कंत्राटी तत्वावर सामावून घ्यावे त्यासाठी जि प मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां कडे प्रस्ताव सादर करण्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

एकनाथराव खडसे यांनी तालुका कृषी अधिकारी पाडवी यांच्या कडून कृषी विभागाचा आढावा घेतला. जुन महिन्यात तालुक्यात झालेल्या वादळी पाऊस मुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई किती गावांना प्राप्त झाली सप्टेंबर महिन्यात येवती, रेवती, जामठी व इतर गावात झालेल्या नुकसानीचे सर्व्हे केले का केळी पिकावर आलेल्या सि एम व्ही रोग आणि कपाशी वर लाल्या रोगावर काय उपाययोजना केली त्याची माहिती घेऊन शेतकरी बांधवांमध्ये याबाबत जनजागृती करावी, अशा खडसे यांनी सूचना दिल्या.एकनाथराव खडसे यांनी शिक्षणाधिकारी लहासे यांच्या कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षक संख्येविषयी व इतर उपक्रमाविषयी आढावा घेतला यावेळी तालुक्यात बहुतांश ठिकाणी चार वर्गावर एकच शिक्षक आहेत असे आढळून आले असता खडसे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्या सोबत दूरध्वनी वरून चर्चा करून बोदवड तालुक्यात शिक्षक वाढवून देण्या बाबत सुचना केल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बेनकुळे यांच्या कडून एकनाथराव खडसे यांनी तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.एकनाथराव खडसे यांनी गटविकास अधिकारी काथेपुरी यांच्या कडून पंचायत समिती अंतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, तालुकाध्यक्ष आबा पाटील, रामदास पाटील, कैलास चौधरी,कैलास माळी, भागवत टिकारे, किशोर गायकवाड, गणेश पाटील, भरत अप्पा पाटील,दिपक वाणी,प्रदिप बडगुजर,विजय चौधरी,विनोद कोळी, रुपेश गांधी,जाफर शेख, हकिम बागवान, मुजमिल शाह,दिपक झंबड,प्रमोद शेळके,रामराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वामन ताठे, प्रमोद फरफट, सतिष पाटील,मधुकर पाटील,डॉ काजळे,गोपाळ गंगतिरे,किरण वंजारी,फिला राजपुत, नाना माळी, नईम खान, संजय पाटील, पांडुरंग पाटील, संभाजी पारधी, प्रफुल लढे, श्याम पाटील, अजय पाटील, रवी खेवलकर पदाधिकारी उपस्थित होते