‘न्याय विश्वास फाउंडेशन’च्या चौथ्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

सप्टेंबर 7, 2026 8:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सर्वसामान्यांचा न्यायावरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि त्यांना आपल्या हक्कांची योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेले चौथे मोफत सल्ला व मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. नवीन कानळदा रोडवरील राजाराम हॉल जळगाव येथे झालेल्या या उपक्रमात ५०० पेक्षा अधिक नागरिकांना विविध प्रश्नांवर तज्ज्ञ वकिलांकडून मोफत मार्गदर्शन करण्यात आले.

nyayf

फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर पार पडले. यामध्ये प्रामुख्याने कौटुंबिक तंटे, पती-पत्नीमधील वाद, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, जमीन-मालमत्तेशी संबंधित प्रश्न, ७/१२ उताऱ्यातील अडचणी आणि शेतीतील तंट्यांवर कायदेशीर दिशा दाखवण्यात आली. याशिवाय ऑनलाईन आर्थिक फसवणूक, वाढते सायबर गुन्हे, प्रॉव्हिडंट फंड , सर्व्हिस मॅटर, पोलीस तक्रारी, एफआयआर, विविध विमा संबंधित खटले ,कोर्टातील प्रलंबित केसेस आणि चेक बाउंसच्या प्रकरणांवर उपस्थितांना मोफत सल्ला देण्यात आला. तसेच महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार आणि शासकीय स्तरावरील मोफत कायदेशीर मदतीबाबतही सविस्तर माहिती पुरवण्यात आली.

या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींनी हजेरी लावून उपक्रमाचे कौतुक केले. यात नगरसेवक राजू भाऊ मराठे, विजय बांदल, सागर शामकांत सोनावणे आणि पूजा विजय जगताप उपस्थित होत्या. तसेच माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, तारा ताई पटेल, संजय शिंपी, दिलीप नजरकर, हकीम पांडे, यामिनी ताई सोनवणे, सागर सोनवणे, संतोष मुथा, माजी नगरसेवक किशोर बाविस्कर, संजय नारखेडे, अनिल साठे, गणेश मुजरा, राजू मोरे, निलेश जाधव, ज्येष्ठ नागरिक लालचंद पाटील व गईभाऊ चौधरी, आदी मान्यवर तसेच शिवाजी नगर,ईद्रंप्रस्थ नगर, जळगाव दुध संघ परिसरातील नागरिक उपस्थित होते.

ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम म्हणाले की, समाजातील कोणताही नागरिक केवळ कायद्याची माहिती किंवा योग्य मार्गदर्शन मिळाले नाही म्हणून आपल्या हक्कांपासून वंचित राहू नये, हा ‘न्याय विश्वास’चा मुख्य उद्देश आहे. या शिबिराला समाजातील विविध स्तरांतील नागरिकांसोबतच विविध जिल्ह्यांतून मिळालेला प्रतिसाद अत्यंत समाधानकारक आहे. नागरिकांचा हा विश्वास हीच आमच्या कार्याची खरी प्रेरणा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now