
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयात जळगाव जिल्ह्यातील पाच विद्यालयांचा समावेश असून, त्यांना विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांची नावे देण्यात आली आहेत.
जळगाव जिल्ह्यातील पाच विद्यालयांची नावे बदलली
राज्य सरकारच्या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, वरणगाव, जामनेर आणि मुक्ताईनगर येथील शासकीय तांत्रिक विद्यालयांना नवी नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे आता ही विद्यालये संबंधित मान्यवरांच्या नावाने ओळखली जाणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील नव्या नावांची यादी
जळगाव – डॉ. अविनाश आचार्य
भुसावळ – डी. के. चौधरी
वरणगाव – कविवर्य केशवसुत
जामनेर – भवरलाल जैन
मुक्ताईनगर – दगडू राठोड
महाराष्ट्रात सध्या एकूण १६२ शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ विद्यालयांच्या नामांतराला मंजुरी देण्यात आली आहे. कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील एकसदस्यीय समितीला नामांतराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. या समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील विद्यालयांची यादी निश्चित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण करणे, तांत्रिक कौशल्यांच्या विकासाला चालना देणे आणि विज्ञान, साहित्य, शिक्षण, समाजकार्य, उद्योग तसेच स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
शासकीय तांत्रिक विद्यालयांची नवीन नावे (जिल्हानिहाय यादी):
१. मुंबई (धोबीतलाव): डॉ. जयंत नारळीकर
२. मुंबई (दादर): विश्वनाथ बेडेकर
३. मुंबई (विलेपार्ले): मोहनलाल चौहान
४. ठाणे: माधवराव भिडे
५. बदलापूर: माधवराव ओक
६. मुरबाड: कृष्णा माळी
७. उल्हासनगर: धरमपाल गुप्ता
८. तलासरी: महादेव अंधेर गुरुजी
९. जव्हार: नवसु दादा वळवी
१०. रत्नागिरी: डॉ. धनंजय कीर
११. राजापूर: वासुदेव जोशी
१२. महाड: सुरबानाना टिपणीस
१३. पेण: जनरल अरुणकुमार वैद्य
१४. रोहा: पांडुरंग शास्त्री आठवले
१५. शिरगाव, सिंधुदुर्ग: आप्पासाहेब गोगटे
१६. नाशिक: डॉ. बाळकृष्ण मुंजे
१७. अहिल्यानगर: अण्णासाहेब कदम
१८. धुळे: वैद्य प्र. ता. जोशी
१९. साक्री: नानासाहेब पाटील
२०. नंदुरबार: बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता





