मोठी बातमी ! जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

नोव्हेंबर 11, 2025 2:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२५ । जळगाव महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित व सोडत कार्यक्रम मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडला. एकूण १९ प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असून त्यात बहुतांश प्रभागांमध्ये महिला आरक्षणाचा समावेश करण्यात आला असून महिलांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

jalgaon manapa

जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागांचे आरक्षण सोडत कार्यक्रम आज सकाळी पार पडला. यामध्ये ४ सदस्यांचे १८ प्रभाग व ३ सदस्यांचा १ प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ ते १९ पर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील जागांसाठी आरक्षण करण्यात आले असून, महिलांसाठीही प्रत्येक गटात योग्य प्रमाणात आरक्षण राखण्यात आले आहे. जळगाव महानगरपालिकेसाठी निवडून देणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या ७५ आहे.

प्रभागनिहाय आरक्षण तपशील
प्रभाग क्र.१
अनु. जाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र. २
अनु. जमाती
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.३
अनु. जाती महिला
अनु. जमाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण

प्रभाग क्र.४
अनु. जाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.५
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.६
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.७
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.८
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.९
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१०
अनु. जाती
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.११
अनु. जमाती महिला
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१२
अनु. जाती
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१३
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१४
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१५
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१६
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१७
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण
सर्वसाधारण

प्रभाग क्र.१८
अनु. जमाती
नागरीकांचा मागासवर्ग महिला
सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र.१९
नागरीकांचा मागासवर्ग महिला
नागरीकांचा मागासवर्ग
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

दरम्यान वर्षभरापासून आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छुक आणि माजी नगरसेवकांचे लक्ष आजच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. दरम्यान आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच आता उमेदवारीबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होऊ शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now