जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२४ । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गरजूंसाठी जीपीएस मित्र परिवारातर्फे भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणी पाळधी येथे होवून गरजू रुग्णांवर पनवेल येथील प्रसिद्ध आर झुनझुनवाला शंकरा रुग्णालयात करण्यात येणार आहे. दरम्यान, रुग्णाच्या निवास, जेवण व प्रवासाची व्यवस्था जीपीएस मित्र परिवारातर्फे करण्यात येणार आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार, नुकतीच जळगाव ग्रामीण मतदार संघातील साधारण ६० रुग्णांवर पनवेल येथील प्रसिद्ध आर झुनझुनवाला शंकरा रुग्णालयात डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यातही नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील नाव नोंदणीस सुरुवात झाली आहे.
पाळधी येथे मोफत नेत्र तपासणी झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पनवेल येथे नेण्यात येईल. प्रवासादरम्यान, तसेच रुग्णालयात दाखल करण्यापासून तर पाळधी येथे परत आणण्याची संपूर्ण सोय जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अनिल महाजन मो.बा. ७५१७५०९०९० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी केले आहे.