जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२५ । सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी असून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) १०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ती म्हणजे RBIने एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना दिले आहेत.

खरंतर जेव्हा तुम्ही बँकेच्या एटीएममधून पैसे काढायला जाता तेव्हा अनेकदा असे दिसून येते की एटीएममधून आपल्याला ५०० रुपयांच्या नोटा मिळतात. परंतु आपल्याला सुट्टे पैसे हवे असतात. अशा परिस्थितीत आपल्या दुसऱ्या कोणाकडून तरी ५०० रुपये सुट्टे घ्यावे लागतात. परंतु आता यावर रिझर्व्ह बँकेने तोडगा काढला आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना दिले आहेत.

आरबीआयने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे आणि त्यात म्हटले आहे की सर्वसामान्या नागरिकांना नोट उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे करणे गरजेचे आहे. एटीएममधून १००,२०० रुपयांच्या नोटा उपलब्ध व्हायला हव्यात.
तसेच बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्संना सांगितले की, याची टप्प्याटप्प्याने अंबलबजावणी व्हायला हवी. व्हाईल लेबल एटीएम हे सरकारी आणि खाजगी बँकांसारखेच काम करतात. आरबीआयच्या या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असंही सांगण्यात आले आहे.












