पदवी पास आहात का? रिझर्व्ह बँकेत 650 पदांसाठी भरती, 58000 पगार मिळेल

फेब्रुवारी 16, 2026 3:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने असिस्टंट पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 650 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. पदवी पास असलेल्या उमेदवारांसाठी आरबीआय बँकेत नोकरी करण्याची ही मोठी संधी असणार आहे. RBI Assistant Bharti

RBI 1

या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया आज, 16 फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि 8 मार्च 2026 पर्यंत सुरू राहील. पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अहमदाबाद, बंगळुरु, जयपूर, मुंबई, कोलकत्ता, दिल्ली अशा अनेक ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. RBI Assistant Recruitment 2026 

भरतीसाठी पात्रता काय?

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असावी. त्यांच्याकडे संगणक कौशल्य असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1998 पूर्वी आणि 1 फेब्रुवारी 2006 नंतर झालेला नसावा. तथापि, राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट मिळेल.

पगार

नोकरीसाठी निवड झाल्यावर बेसिक पे 29000 रुपये मिळणार आहे. तुम्हाला इतर भत्ते मिळून एकूण 58, 514 रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स, मेन्स, लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्टद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा 11 एप्रिल 2026 रोजी होणार आहे.

असा करा अर्ज

फॉर्म भरण्यासाठी, प्रथम अधिकृत पोर्टल ibpsreg.ibps.in/rbiafeb26/ ला भेट द्या.
“नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
आता इतर तपशील योग्यरित्या भरून फॉर्म पूर्ण करा.
तुमची स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करा.
विहित शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
प्रिंटआउट घ्या आणि ते सुरक्षित ठेवा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now