जळगाव लाईव्ह न्यूज । नापीक, कर्जबाजारीसह विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत असून याच दरम्यान कर्जबाजारील कंटाळून ३२ वर्षीय युवा शेतकऱ्याने कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना रावेर तालुक्यातील अजनाड येथे उघडकीस आली असून योगेश भागवत चौधरी वय ३२ वर्ष असं मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत असं की, अजनाड गावात राहत असलेला युवा शेतकरी योगेश भागवत चौधरी या युवकाने दि. १९ मार्च रोजी संध्याकाळी घरच्या शेतात निंबाच्या झाडाला फाशी घेऊन जीवनयात्रा संपवली. दरम्यान रात्री त्यांचे मोठे भाऊ यशवंत चौधरी यांनी शोधाशोध केली असता त्यांना शेतामध्ये योगेश चौधरी यांचा मृतदेह दिसून आला.
त्यानंतर त्यांनी अजनाड पोलीस पाटील महेंद्र पाटील, उपसरपंच विजय पाटील यांना सांगितले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. अजनाड गावावर शोककळा पसरली आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जैसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.