राणा दाम्पत्य ५ सप्टेंबरला जळगावात, हनुमान चालिसाचे होणार पठण!

सप्टेंबर 3, 2022 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे 5 रोजी जळगाव येथे येत असून त्यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. भाजपा नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे यांच्या गणेशोत्सव मंडळाला राणा दाम्पत्य सोमवारी भेट देतील व यावेळी त्यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण केली जाणार आहे.

jalgaon 2022 09 03T173525.076 jpg webp

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा प्रथमच खान्देशातील जळगावात येत असल्याची माहिती युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष अक्षय शिंदे, सोशल मीडिया प्रसिध्दी प्रमुख दीपांशु लोणे यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ला दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now