⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जळगाव शहरातील हिराशिवा कॉलनीतील राजेश पाटील बेपत्ता : परिसरात खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । कामावर जातो असे सांगत दुचाकी घेवून राजेश शिवाजीराव पाटील (वय-५०, रा. हिराशिवा कॉलनी) हे बेपत्ता झाल्याची घटना उघउकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हिराशिवा कॉलनीतील राजेश शिवाजीराव पाटील (वय-५०, रा. हिराशिवा कॉलनी) हे शुक्रवारी ३ जून रोजी सकाळी ९ वाजता जैन इरिगेशन कंपनीत कामावर जावून येतो.

असे सांगून (एमएच १९ ऐसी ४११६) क्रमांकाची दुचाकी घेवून गेले. अद्यापर्यंत ते घरी परतले नसल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. ते शरीराने सडपातळ असून रंग सावळा तर चेहरा लांबट आहे. अंगावार त्यांनी निळी पॅन्ट व काळ्या चेक्सचा शर्ट घातला आहे. त्यामुळे त्यांचा भाऊ अविनाश पाटील यांनी रविवारी ५ जून रोजी सायंकाळी तालुका पोलिसात हरविल्याची तक्रार दिली असून त्यानुसार पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ लिलाधर महाजन हे करीत आहे.