‘तारक मेहता…’च्या चाहत्यांना आणखी एका धक्का ; मालिकेला ‘या’ कलाकाराने ठोकला रामराम

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. वर्षानुवर्षे अनेक अभिनेते या शोमध्ये सामील झाले आणि बरेच जण सोडून गेले. गेल्या काही दिवसांपूर्वी शैलेश लोढाने ही मालिका सोडली होती. आता शैलेशनंतर आणखी एका कलाकाराने मालिकेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. Taarak Mehta ka Ooltah Chashmah

तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधील टप्पू म्हणजेच राज अनडकटने शो सोडला आहे. त्याने ही माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. टप्पूने शो सोडल्याने चाहते दु:खी झाले आहेत. राज ही मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यानंतर या अफवा असल्याचं राजने म्हटलं होतं. मात्र आता राजनेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मालिकेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आहे.

मी पुन्हा येईन…
राजने पुढे लिहिलं आहे,”तारक मेहता मालिकेची संपूर्ण टीम, माझे मित्र, कुटुंबिय आणि तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार. तब्बू या पात्रावर तुम्ही सर्वांनी खूप प्रेम केलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मी लवकरच पुन्हा येईन आणि तुम्हा सर्वांचं मनोरंजन करेन. तुमचं प्रेम आणि शुभेच्छा असेच असुद्या”.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत टप्पूचे पात्र आधी भव्य गांधी साकारत होता. पण काही कारणाने भव्यने ही मालिका सोडली. त्यानंतर राजने हे पात्र साकारले. राजने मालिका सोडण्याचं खरं कारण सांगितलेलं नाही. करिअरच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यासाठी त्याने ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे.