⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

राज्यात पुढील ४ दिवसांत विजांच्या गडगडाटासह पाऊस ; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२१ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या मुसळधारमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असता आता राज्यात पुढील 4,5 दिवसात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. विजा चमकताना बाहेरची कामं टाळा, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे . ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

गुलाब चक्रिवादळामुळे राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.  राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट
4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली

5 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली 4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर,

6 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे

7 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग