---Advertisement---
बातम्या

जळगावात पावसाने घेतला पुन्हा ‘ब्रेक’; आता जिल्ह्यात ‘या’ तारखेनंतर जोरदार पावसाचा अंदाज

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतल्यामुळे उकाड्यात वाढ झाल्याने जळगावकर हैराण झाला. मात्र सोमवार आणि मंगळवारी जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने पुन्हा एकदा ब्रेक घेतला. यामुळे जळगावचे तापमान ३३ अंशावर गेले असून उकाड्यात मोठी वाढ झाली. यामुळे जळगावकर हैराण झाला. आता जिल्ह्यात पुन्हा पावसाचं कमबॅक होणार याकडे लक्ष लागले असून अशातच हवामान खात्याकडून २५ ऑगस्टपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा वेग वाढण्याचा असल्याचा अंदाज वर्तविला आहे. आगामी तीन-चार दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊसही होण्याचा अंदाज आहे.

rain break

जळगाव जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली होती. यामुळे शेतीतील रखडलेली कामेदेखील मार्गी लागली. सोमवारी व मंगळवारी सायंकाळी व रात्री चांगला पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला . या दोन दिवसांत जिल्ह्यात २५ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी १७मिमी, तर मंगळवारी ८ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात करण्यात आली आहे. त्यापूर्वी ७ ऑगस्ट ते १६ ऑगस्टदरम्यान केवळ ८ मिमी पाऊस झाला होता, तर पहिल्या आठवड्यात ७८ मिमी पाऊस झाला होता.

---Advertisement---

सध्या पावसाने पुन्हा ब्रेक घेताच तापमानात वाढ झाली. दिवसभर उन्हाचे चटके लागत असल्यामुळे हा पावसाळा आहे की उन्हाळा? असं जाणवत आहे. उकाडाही वाढल्यामुळे जळगावकर हैराण झाला आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात संमिश्र वातावरण निर्माण होणार आहे. दुपारपर्यंत तापमान ३२ ते ३५ अंशांदरम्यान राहून, असह्य उकाडा जाणवू शकतो, तसेच काही अंशी ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याने उकाड्यात भर पडणार आहे. मात्र, सायंकाळी ५ वाजेनंतर पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. २२ ते २५ ऑगस्टपर्यंत अशीच स्थिती जळगाव जिल्ह्यात राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची स्थिती निर्माण होत असून, २५ पासून जिल्ह्यात पावसाला जोर येऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---