⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सण-उत्सवानिमित्त रेल्वेचा प्रवाशांना दिलासा : वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर, नागपूर ते पुणे आणि अजनी ते मुंबई या विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. या गाड्या एक ऑक्टोंबरपासून धावण्यास सुरूवात झाली आहे.

01075 एकेरी अतिजलद विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून शनिवारी (दि.1) रात्री 12.20 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी 3.32 वाजता पोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे दिले आहे. तर नागपूर- मुंबई वन वे स्पेशल गाडी 01017 एकेरी सुपरफास्ट विशेष गाडी नागपूर येथून गुरूवारी (दि. 6) सकाळी 8.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री 11 वाजता पोहोचेल. या गाडीला सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथे थांबे दिले आहे.

नागपूर-पुणे वन वे विशेष गाडी 01030 एकेरी सुपरफास्ट विशेष असून ही बुधवारी (दि. 5) नागपूर येथून रात्री 7.40 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 11.35 वाजता पोहोचेल. या गाडीला सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन येथे थांबे दिले आहे. यागाड्यांना दोन एसी 2, आठ एसी 3, पाच शयनयान, चार जनरल असे डबे असतील.

01011 एकेरी सुपरफास्ट व विशेष गाडी अजनी येथून गुरूवारी (दि. 6) सायंकाळी 7.40 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 11.20 वाजता पोचेल. या गाडीला सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे येथे थांबा आहे. या गाडीला 11 शयनयान, 11 सामान्य असे डबे असतील.

12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस, 22137 नागपूर – अहमदाबाद एक्सप्रेस, 12810 हावडा- मुंबई मेल व्हाया नागपूर, 22906 शालिमार-ओखा एक्सप्रेस, 12843 पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस, 12130 हावडा – पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, 12146 पुरी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12834 हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस य गाड्यांना दोन मिनीटाचा थांबा दिला आहे.

22511 लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या एक्सप्रेस, 12101 लोकमान्य टिळक टर्मिनस -शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, 12129 पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, 12809 मुंबई- हावडा मेल व्हाया नागपूर, 12879 लोकमान्य टिळक टर्मिनस -भुवनेश्वर एक्सप्रेस, 12833 अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेस, 12859 मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस व 20824 अजमेर -पुरी एक्सप्रेस या गाड्या थांबणार आहे.

12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, 12810 हावडा- मुंबई मेल नागपूर मार्गे, 12102 शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, 20861 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस, 12130 हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस, 12849 बिलासपूर- पुणे एक्स्प्रेस, 12834 हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस या गाड्यांना दोन मिनीटांचा थांबा देण्यात आला आहे.