जळगाव लाईव्ह न्यूज । नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज जळगाव पोलीस मुख्यालयात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सुमारे ५५० सदस्य सहभागी झाले होते. त्यांच्या सक्रिय सहभागातून पोलीस मुख्यालयाच्या संपूर्ण परिसरात एकूण २३२० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण जतनाचे महत्त्व पटवून देत हा उपक्रम उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.

कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सदस्य तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जळगावचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, , उपअधीक्षक (गृह शाखा) संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच जळगाव पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे पोलीस मुख्यालय परिसर हिरवाईने नटणार असून पर्यावरण संरक्षणासाठी समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे.
“झाडे लावा, झाडे जगवा!”
या भव्य मोहिमेच्या माध्यमातून जळगाव पोलीस आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने संपूर्ण जिल्ह्याला पर्यावरण संवर्धनाचा एक अतिशय प्रभावी संदेश दिला आहे.










