10वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेत तब्बल 11,127 पदांच्या महाभरतीला सुरुवात

मे 15, 2026 1:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही भारतीय रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) देशभरात सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot) पदासाठी तब्बल ११,१२७ जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. Railway Bharti 2026

railway bharti

विशेष म्हणजे, केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनाही या प्रक्रियेत सहभागी होता येणार असल्याने रोजगाराची एक मोठी संधी निर्माण झाली आहे. या मेगा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू होणार असून, १४ जून २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल.

लोको पायलट होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना (CEN ०१/२०२६) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज भरताना कागदपत्रे अपलोड करताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच, परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांनी आतापासूनच सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आणि तांत्रिक विषयांवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरणार आहे.

पात्रतेचे निकष आणि वयोमर्यादा:
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांचे किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (तांत्रिक पात्रता व आयटीआय धारकांसाठी ही मोठी संधी असेल.)

वयोमर्यादा: या पदांसाठी १८ ते ३० वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

वेतनश्रेणी: निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा १९,९०० रुपये मूळ वेतन आणि रेल्वेचे इतर सरकारी भत्ते दिले जातील.

अर्ज शुल्क : सामान्य व ओबीसी प्रवर्गासाठी ५०० रुपये, तर अनुसूचित जाती, जमाती व महिलांसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल. अधिकृत संकेतस्थळ : उमेदवारांनी indianrailways.gov.in यावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now