⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | बातम्या | मी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते कि.. येतेय मराठीतील सर्वात बोल्ड वेबसिरीज, टिझर पहिले का?

मी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते कि.. येतेय मराठीतील सर्वात बोल्ड वेबसिरीज, टिझर पहिले का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । गेल्या काही वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीजने धुमाकूळ घातला आहे. अनेक हिट वेबसिरीज ओटीटीने दिल्या असून लॉकडाऊन काळापासून दर्शकांना त्याचे अधिक वेड लागले आहे. मराठीत देखील काही वेबसिरीज आल्या असून अभिजित पानसे लिखित सत्य घटनांवर आधारित एक वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठीवर येत आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ अशी ओळख असलेल्या या वेबसिरीजचे दोन टिझर सध्या लॉन्च झाले असून अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणाऱ्या या ‘रानबाजार’च्या टीझरनेच अनेकांची झोप उडाली असून ट्रेलर १८ मे ला येणार आहे.

‘रानबाजार’चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले असून यापूर्वी त्यांनी रेगे, ठाकरे अशा ज्वलंत आणि संवेदनशील विषयांना हात घातला होता. अभिनेत्री तेजस्विनी पंडित या आणि प्राजक्ता माळी वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत आहे तर प्लॅनेट मराठीने या वेब सिरीजची निमिर्ती केली आहे. ‘असच काहीसं घडलं होतं.. कदाचित?’ एक वाक्य त्यांनी पोस्टरवर लिहिलं आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित व प्राजक्ता माळीने टिझर सोबत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. ‘एकदा लोकांची सेवा करून पाहिली… एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला …एकदा बदलाही घेतला ..! आता मात्र फसत चाललीय …. सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…’ असे हे कॅप्शन दिले आहे. सत्य घटनांवर आधारित या वेब सिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दुसरा टिझर शेअर केला असून ‘आजवर आपण तिला अनेक भूमिका साकारताना पाहिलं.. एक कलाकार म्हणून स्वतःला एका चौकटीत न बांधता आपल्या व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण विरोधी भूमिका साकारण्याचा प्रयत्न प्राजक्तानं ‘रानबाजार’मध्ये केलाय.. असे तिने कॅप्शन दिले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने टिझर शेअर करीत ‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्र साकारण्याची, सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले. (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरित होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेऊन केलेला हा प्रयत्न. असे कॅप्शन तिने दिले आहे.

पहा पहिला टिझर..

‘रानबाजार’चे दोन टिझर सध्या प्लॅनेट मराठीवर लॉन्च झाले असून पहिल्या टिझरमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित चक्क विवस्त्र झाली आहे. तर दुसऱ्या टिझरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचा प्रणय प्रसंग करतानाचा सीन आहे. इतकंच नव्हे तर त्यात प्राजक्ता माळी एक वृत्तपत्र वाचत असून त्यात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख आहे. सत्य घटनांवर आधारित असलेली ही वेबसिरीज असल्याचे सांगितले जात असून त्याचा राजकारणाशी नक्कीच संबंध आहे. वेबसिरीजचा ट्रेलर दि.१८ मे रोजी येणार असून सर्वांना त्याची उत्सुकता लागलेली आहे.

पहा दुसरा टिझर..

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.