⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला कठोर शिक्षा द्या : तेली समाज

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यात अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणीचे निवेदन तेली समाज व शिवसेना महिला आघाडीतर्फे पोलीस डॉ. प्रविन मुंढे यांना देण्यात आले.

तालुक्यात २० रोजी घटना घडली होती. या घटनेचा विरोधात जनमानसात प्रचंड व्यक्त होत आहे. अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिले यासाठी नागरिक यावर उतरले आहेत. तेली समाज व शिवसेना महिला आघाडीतर्फे पोलिस अधीक्षक कार्यालयात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत पोलिस अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले. तसेच पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुद्रे यांना आज विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हा खटला फास्टटक कोर्टात चालविण्यात यावा तसेच खटल्यात सरकारी वकील म्हणून ऍड. केतन ढाके यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी शिवसेना महिला आघडीच्या सरिता माळी, कोल्हे शोभा चौधरी यांच्यासह महिला वर सहभागी झाल्या होत्या.