जळगाव लाईव्ह न्यूज | ८ एप्रिल २०२२ । आप चे जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर व ज्येष्ठ सल्लागार डॉ. सूनील गाजरे, जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख व प्रवक्ता यांच्या नेतृत्वाखाली तिघांनी दि आमी आदमी पार्टी मध्ये नुकताच प्रवेश केला.

काल दि. ७ एप्रिल रोजी आम आदमी पार्टीमध्ये सिनेअभिनेता पवन खंबायत, सिनेमा डायरेक्टर व जळगाव आयकॉन टीव्हीचे संचालक हेमराज सोनवणे, श्रीराम फॉर्च्यून प्रायव्हेट लिमिटेडचे बिडीएम भूपेंद्र ठाकरे यांनी काल दि.७ एप्रिल रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.













