पाटील महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी कार्यक्रम संपन्न

फेब्रुवारी 18, 2022 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । एरंडोल येथे दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जिजाऊ ते सावित्री महाराष्ट्राच्या लेकीचा सन्मान अभियानाअंतर्गत किशोर वयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर उज्वला राठी यांचे प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा.शारदा भुरे होत्या.

patil college jpg webp

सूत्रसंचालन प्रा.एच.ए.आहीरराव यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा.रेवती सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.पल्लवी पाटील व प्रा.कविता चौथे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.जे एम चव्हाण, प्रा.आर एम पाटील, प्रा. जयश्री देशमुख, प्रा.एम सी सोनवणे, प्रा. सपना पाटील तसेच जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या के.डी.पाटील, लता आढळकर यांच्यासह महाविद्यालयाच्या व माध्यमिक विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now