पंतप्रधान मोदी जगभरातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल ; ‘या’ बड्या नेत्यांना टाकले मागे

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून गणले गेले आहेत. यूएस-आधारित सल्लागार कंपनी ‘मॉर्निंग कन्सल्ट’ च्या ताज्या सर्वेक्षणात, पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक 78 टक्के मान्यता रेटिंगसह लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल आहेत.

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, PM मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह 16 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा समावेश आहे

या सर्वेक्षणात, पीएम मोदींना 78 टक्के मंजूरी रेटिंग मिळाली आहे, जी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यापेक्षा खूप पुढे आहे, ज्यांना 40 टक्के मंजूरी रेटिंग मिळाली आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 68 टक्के मान्यता रेटिंगसह दुसरे, तर स्विस राष्ट्राध्यक्ष अलेन बेर्सेट 62 टक्के मान्यता रेटिंगसह तिसरे आले. तसेच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनी याचे रेटिंग 52 टक्के आहे.

याशिवाय, भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत 10 व्या स्थानावर आहेत. जागतिक नेत्यांमध्ये त्यांचे रेटिंग 30 टक्के आहे. सर्वेक्षणानुसार, 2021 नंतर पीएम मोदींची लोकप्रियता आणखी वाढली आहे. त्यामुळे ते अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत.