जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव पोलीस मुख्यालयातील सहकारी पोलीस कर्मचारी PC/3407 पियूष चंद्रकांत चौधरी (वय २४ वर्षे) हे सध्या रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, Chemotherapy आणि Bone Marrow Transplant (BMT) साठी अंदाजे २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत (MPKAY) उपचारासाठी सुमारे ८ लाख रुपयांची मदत मंजूर होत आहे. मात्र, उपचारासाठी आवश्यक असलेल्या एकूण खर्चाच्या तुलनेत आणखी १७ लाख रुपयांची रक्कम उभी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पियूष चौधरी यांच्या उपचारासाठी पोलीस बांधव, मित्रपरिवार आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पियूष चौधरी हे अवघ्या २४ वर्षांचे असून, त्यांच्या उपचाराचा खर्च मोठा असल्याने कुटुंबीयांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. या कठीण प्रसंगी मिळणारी प्रत्येक छोटी-मोठी मदत त्यांच्या उपचारासाठी मोलाची ठरणार आहे.
आपल्या सहकाऱ्याच्या उपचारासाठी मदतीचा हात द्या
‘आपल्या परीने शक्य ती आर्थिक मदत करून सहकाऱ्याच्या जीवनासाठी हातभार लावावा. आपली छोटीशी मदतही पियूष यांच्यासाठी मोठा आधार ठरेल,’ असे आवाहन करण्यात आले आहे.
मदतीसाठी बँक व UPI तपशील
खातेदार: Piyush Chandrakant Chaudhari
बँक: Axis Bank, Jalgaon
खाते क्रमांक: 923010034041953
IFSC: UTIB0000174
GPay / PhonePe / UPI: 9373371461
संपर्क
Piyush Chaudhari: 9373371461
Kunal Chaudhari: 9158023652
Dinesh Adhikar: 8407917043
Hitesh Rathod: 8108647307
या कठीण काळात पियूष चौधरी यांच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे करून त्यांना नव्या आयुष्याची आशा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










