जामनेर

पाळधी येथून २० वर्षीय महिला बेपत्ता

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । जामनेर तालुक्यातील पाळधी येथून २० वर्षीय मतिमंद महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पहूर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

missing 3 jpg webp

काजल माधव वाणी (वय २०) असे बेपत्ता झालेल्या मतिमंद महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार काजल वाणी हिसे अंदाजे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु, त्या मतिमंद असल्याने पतीकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यामुळे ती गेल्या तीन वर्षांपासून आई-वडील हयात नसल्याने भाऊ भूषण वाणी याकडे राहत होत्या.

त्या मतिमंद असल्यामुळे नेहमी भटकंती करत होत्या. दि. २७ रोजी तीसे भाऊ भूषण माधव वाणी हे बाहेर गावी गेले असताना त्या बेपत्ता झाल्या. याबाबत भूषण याने पहूर पोलिसात हरविल्याची फिर्यादी दिली. तपास प्रदीप चौधरी करीत आहे.

Related Articles

Back to top button