जामनेर शहरातून बुलेट चोरी

जून 13, 2022 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । जामनेर शहरातील आयटीआय कॉलनी भागातून अनोळखी भामटयाने बुलेट लंपास केल्याची घटना घडली. याबाबत जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

crime 2022 06 13T105918.162 jpg webp

पवन गोविंद पाटील ( वय ३५ ) यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार शहरातील आयटीआय कॉलनी, त्यांच्या घरासमोर लावलेली ५५ हजार किमतीची, ( क्र. एमएच १९ डीआर ४६६१ ) दुचाकी दि. ७ रोजी मध्यरात्री अनोळखी भामट्याने चोरून नेली. या प्रकरणी पाटील यांनी दि. १२ रोजी पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार अनोळखी भामट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोना. राजू तायडे करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now