⁠ 
सोमवार, मे 20, 2024

पहूर केंद्रातील ४२ शिक्षकांची केंद्र प्रमुखाविराेधात शिक्षकांची तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । जामनेर तालुक्यातील पहूर केंद्रप्रमुखाच्या जाचाला कंटाळून तक्रार देण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात आलेल्या महिला शिक्षिकांना अक्षरश: रडू कोसळले. केंद्र प्रमुखांची पत्नी वगळता सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिकांनी केलेली तक्रार पहाता प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनी दोन दिवसात समोरासमोर बसून विषय मिटवण्याचे आश्वासन दिले.

भानुदास रामशंकर तायडे हे पहूर केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत. त्यांच्या केंद्रात जिल्हा परिषदेच्या १५ प्राथमिक शाळा व ४५ शिक्षक कार्यरत आहेत. तायडे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना विनाकारण त्रास देतात. या कारणावरून ४५ पैकी ४२ शिक्षकांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. अनेक शिक्षकांनी यापूर्वीही तक्रारी केलेल्या आहेत. त्यावरून प्रभारी गटशिक्षणाधिकारी सरोदे यांनी संबंधित केंद्रप्रमुख तायडे यांना समज दिली आहे. मात्र, त्यानंतरही वाढता त्रास पहाता त्रस्त शिक्षकांनी पुन्हा तक्रार दिली.

दरम्यान, वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे शिस्तबद्धरीत्या काम करताना बेशिस्त शिक्षकांना ते सहन होत नाही. शिक्षक उशिरा येण्याचे प्रकार, अनेकवेळा शाळा बंद, जयंती, पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिनास अनुपस्थित राहणे, असे प्रकार निदर्शनास आल्याने काही शिक्षकांना पत्र दिले. नियम पाळण्याबाबत सक्ती करत असल्याने निवेदन देऊन माझ्यावर दबाव आणण्याचा शिक्षकांचा हा प्रयत्न आहे. असे केंद्र प्रमुख भानुदास तायडे यांनी सांगितले.