जळगाव लाईव्ह न्यूज | ६ जानेवारी २०२३ | बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या अमळनेर तालुका प्रमुखपदी युवा नेते प्रथमेश मधुकर पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

बाळासाहेब शिवसेना पक्षाच्या (शिंदेगट) अमळनेर तालुका प्रमुखपदी प्रथमेश मधुकर पवार यांची नियुक्ती पक्षाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सचिव संजय मोरे यांनी केली. प्रथमेश पवार हे टाकरखेडे येथील जिजाऊ आयटीआयचे संचालक असून माजी भाजपा नेत्या सुरेखा पवार (कंडारी) यांचे चिरंजीव आहेत.
दरम्यान, या निवडीबद्दल जिल्ह्याचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा पदाधिकारी वासुदेव पाटील, अमळनेरचे माजी नगरसेवक संजय कौतीक पाटील, सुरेश अर्जुन पाटील, माजी सभापती दीपक पाटील, माजी नगरअध्यक्ष प्रभाकर नारायण पाटील यांच्या सह शिवसेना शिंदे गट कार्यकर्ते आदींनी अभिनंदन केले आहे.