जळगाव जिल्हा

आसाेद्यात ग्रामपंचायतीच्या रिक्त एका जागेसाठी उद्या मतदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । आसोदा येथील वॉर्ड क्रमांक चारमधील महिला आरक्षित सर्वसाधारण एका रिक्त जागेसाठी १८ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार रविवारी संपला.

आसोद्यात डिसेंबरमध्ये महिला ओबीसी जागेसाठी हे मतदान होणार होते. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे ही जागा बदलून जनरल महिला राखीव करण्यात आली. सार्वत्रिक निवडणूकीत ओबीसी जागेवर शकुंतला रमेश महाजन या वॉर्ड क्रमांक चारसह वॉर्डक्रमांक पाचमधून निवडून आल्या होत्या. यामुळे त्यांनी वॉर्ड क्रमांक चारमधून राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.

या एका जागेसाठी पूजा नरेंद्र नारखेडे, संध्या विलास सावदेकर, सविता भास्कर नारखेडे, सुनिता वसंत चौधरी हे उमेदवार रिंगणात आहेत. या वॉर्डात सुमारे १५०० मतदार आहेत.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button