---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगाव मध्ये ‘द बर्निंग’ कारचा थरार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२५ । जळगाव मध्ये ‘द बर्निंग’ कारचा थरार समोर आला आहे. शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ आज (दि.२४) सकाळी एका चारचाकीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण कार जाळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून या आगीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला, परंतु सुदैवाने या घटनेत कोणालाही जीवितहानी झालेली नाही.

d Barning

मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीर सिंग हे त्यांच्या गाडीमध्ये प्रवास करत असताना अचानक गाडीला आग लागली. या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आणि गाडीचा मोठा आगीचा प्रसार थांबवला.

---Advertisement---

घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी काही प्रयत्न केले, परंतु अग्निशमन दलाच्या वेगवान कार्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी, त्यामध्ये कोणालाही शारीरिक इजा झाली नाही. घटनेची पुढील तपासणी सुरु आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---