---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचा निर्धार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । महिला बचत गट (Mahila Bachat Gat) चळवळ अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना येण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून राज्यात विविध विभागांत ‘मिनी सरस प्रदर्शन’ सुरू करण्यात आले. यामुळे बचत गटाच्या उलाढालीत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत होत असलेल्या प्रदर्शनात 10 कोटींची उलाढाल होत असे, परंतु विभागीय प्रदर्शनांमुळे ही उलाढाल 22 कोटींपर्यंत पोहोचली आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले.

lakhpati didi

जळगाव जिल्ह्यातील उमेदच्या वतीने आयोजित मिनी सरस प्रदर्शन-2025 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते जि. एस. ग्राऊंडवर झाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बचत गट चळवळीला अधिक व्यापक करून 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

---Advertisement---

महिला बचत गट सशक्त होण्यासाठी मोठे पाऊल
राज्यात सुमारे 65 लाख महिला बचत गट कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या माध्यमातून राज्यातील महिला केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातही आपल्या वस्तू निर्यात करत आहेत. राष्ट्रीयकृत बँकाही बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवत असून, त्याचे नियमित पुनर्भरण होत असल्याने बँकांचे एनपीए टाळले जात आहे. राज्यातील बँकांनी आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटांना वितरित केल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

मुक्ताई सरस प्रदर्शनाची यशस्वी परंपरा
महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वस्तूंचे आकर्षक पॅकिंग व विपणन गरजेचे आहे. याची जाणीव ठेवून 2010 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मुक्ताई सरस प्रदर्शनाची सुरुवात केल्याचा आनंद खा. स्मिता वाघ यांनी व्यक्त केला. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून माऊथ पब्लिसिटी महत्त्वाची ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

जळगावकरांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन
प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी 23 ते 27 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाला जळगावकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन केले.

खाद्य पदार्थांचा आस्वाद व महिलांच्या आनंददायक प्रतिक्रिया
प्रदर्शनामध्ये मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन खरेदी केली व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनाही आग्रहाने सहभागी करून घेतल्याने स्टॉल धारक महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---