जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील मुघल गार्डन परिसरातील सय्यद असरारूल कादरिया मशिदजवळील मोकळ्या जागेत पोलीसांनी केलेल्या कारवाईत गोवंशाचे मांस व अवैधरित्या कोंबून ठेवलेल्या २५ गोवंशाची सुटका करण्यात आली.
त्यांना गोशाळेत रवाना करण्यात आली. सहा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरूवार २९ जून रोजी सकाळी पोलीस उपअधिक्षक यांचे पथक व शहर पोलीसांनी केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या कारवाईत पोलीसांनी संशयित आरोपी वकार युनूस मोईद्दिन शेख (वय-२९) रा. मोहमदीया नगर, इमरान खान रहेमान खान (वय-३८) रा. मुघल गार्डन, शेख दानिश शेख इरफान (वय-२१) रा. उस्मानिया पार्क, सैय्यद शहीद सैय्यद यासीन (वय-३२) रा. भिलपूरा, जळगाव, जावेद शेख रशिद शेख (वय-३४) रा. मुघल गार्डन आणि मोहम्मद अयुब हकीमोद्दिन खान (वय-३२) रा. मुघल गार्डन, जळगाव यांना ताब्यात घेतले असून चौकशीचे काम सुरू आहे.
यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, भरतसिह पाटील, बशिर तडवी, वाहेद तडवी, पोहेकॉ भास्कर ठाकरे, रतन गिते, तेजस मराठे, योगेश पाटील, कमलेश पाटील, राजकुमार चव्हाण, दिपक पाटील तर पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, सचिन साळुंखे, किरण धमके, विजय काळे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कारवाई केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.