जळगावात सोमवारपासून सुरु होणार पोलिसांचा गोळीबार सराव

फेब्रुवारी 17, 2022 10:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । पोलिसांना अचूक निशाणा साधता यावा यासाठी जळगावात पोलिसांचा गोळीबार सराव १४ फेब्रुवारी ते १२ मार्चच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांनी अकारण फिरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

crime 5

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज एका परिपत्रकाच्या माध्यमातून पोलिसांच्या गोळीबार सरावाबाबतची माहिती दिली आहे. यानुसार सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरात असणार्‍या फायरींग बट या परिसरात दिनांक १४ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२० या कालावधी दररोज सकाळी सहा वाजेपासून पोलीस दल गोळीबाराचा वार्षीक सराव करणार आहे.

या दरम्यान, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार आणि कर्मचारी गोळीबाराचा सराव करणार आहेत. यामुळे सावखेडा शिवारातील कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांनी या परिसरात अकारण फिरू नये, तसेच गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी या परिपत्रकात केले आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now