चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांना पोलिसांनी केली अटक

फेब्रुवारी 6, 2022 5:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । एमआयडीसीतील बंद असलेल्या ट्राइडन कंपनीत चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

crime 4 1 jpg webp

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना शनिवार दुपारी तीन वाजता संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काझी, विकास सातदिवे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंढे, सतीश गर्जे यांच्या पथकाने कंपनीत धाव घेतली. या वेळी तिथे तनवीर शेख चांद (वय २३, रा. दत्तनगर), जुम्मा सलीम पिंजारी (वय ३१, रा. तांबापुरा) व मजहर खान सकावत खान (वय २५, रा. पिंप्राळा हुडको) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now