⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | बहिणाबाईंच्या जयंती निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि जैन फाऊंडेशनतर्फे कवी संमेलन

बहिणाबाईंच्या जयंती निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि जैन फाऊंडेशनतर्फे कवी संमेलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| २३ ऑगस्ट २०२३। बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची गुरुवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता १४३ वी जयंती साजरी होत आहे. या औचित्याने निमंत्रित कवींचे कवी संमेलनाचे आयोजन केलेले आहे.

कवी संमेलनाचे लाईव्ह बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या यूट्युब चॅनल, फेसबुकवर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. जगदीश देवपूरकर, धुळे आणि ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी आणि बहिणाई परिवारातील सदस्य तसेच वाड्यातील रहिवासी यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४३ व्या जयंती निमित्त जुन्या जळगावातील बहिणाबाईंच्या राहत्या घरी, चौधरी वाड्यात बहिणाबाई चौधरी ट्रस्ट आयोजित आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या सहयोगाने निमंत्रित कवींचे कवी संमेलनाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून श्री. जगदीश देवपूरकर, धुळे यांच्यासोबत कवीवर्य अशोक पारधे, शीतल पाटील, पुष्पा साळवे, सौ. वंदना महाजन, वंदना चव्हाण, अरुण पाटील आणि ज्ञानेश्वर शेंडे हे उपस्थित असतील. प्रत्येक कवी थोडक्यात स्वलिखित दोन कविता आणि बहिणाबाईंची एक कविता सादर करतील असे नियोजन आहे.

तसेच माउली सेवा फाऊंडेशन, जय महाकाली कलावंत सांस्कृतिक बहुद्देशीय संस्था आणि समुद्धी प्रकाशनातर्फे २६ ऑगस्ट रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे देखील दुअप्री ३ वाजेच्या सुमारास सामजिक, कला, साहित्य एकता संमेलन होणार आहे. माजी मंत्री सतीश पाटील व अभिनेते सुनील गोडबोले उपस्थित रहाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह