⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. 12व्या हप्त्याचे पैसे खात्यात झाले ट्रान्सफर ; याप्रमाणे त्वरित तपासा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पंतप्रधान मोदींनी पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्यासाठी पैसे जारी केले आहेत. योजनेअंतर्गत 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत तुम्ही लाभार्थी असाल तर तुमचे खाते तपासा. पैसे आले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खाते ऑनलाइन तपासू शकता. PM Kisan 12th Installment

16 हजार कोटी हस्तांतरित
यापूर्वी, 11 वा हप्ता 31 मे 2022 रोजी पीएम मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला होता. 17 ऑक्टोबर रोजी भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR), पुसा येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान PM मोदींनी DBT द्वारे 12 वा हप्ता जारी केला. पीएम मोदींनी डीबीटीद्वारे 16 हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली. यादरम्यान, पंतप्रधानांनी शेतकरी आणि कृषी स्टार्टअप्स, संशोधक, धोरणकर्ते, बँकर्स आणि इतर भागधारकांना संबोधित केले.

ऑनलाइन स्थिती तपासा
सर्वप्रथम पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/ वेबसाइटवर जा.
येथे उजव्या बाजूला ‘शेतकरी कॉर्नर’मध्ये ‘लाभार्थी स्थिती’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
नवीन वेब पेज उघडल्यानंतर, मोबाईल क्रमांक/नोंदणी क्रमांकामधून कोणताही एक पर्याय निवडा. याद्वारे तुम्ही खात्यात पैसे आले की नाही हे तपासू शकता.
तुम्ही निवडलेल्या पर्यायाची संख्या एंटर करा. त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
येथे क्लिक करून, तुम्हाला सर्व व्यवहाराची माहिती मिळेल. येथून तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता निघाला आहे की नाही.

अशा शेतकऱ्यांना मिळणार ४ हजार रुपये!
जे ई-केवायसी करणार नाहीत त्यांना १२व्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार नाहीत, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. जर काही कारणास्तव 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात आले नाहीत आणि यावेळी तुम्ही ई-केवायसी पूर्ण केले असेल तर तुमच्या खात्यात 4000 रुपये आले असतील. यापैकी 2000 रुपये 11 व्या हप्त्यासाठी आणि 2000 रुपये 12 व्या हप्त्यासाठी आहेत.