Tuesday, July 5, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

शहरात डांबरी रस्ते करताना प्लास्टिक वेस्टचा उपयोग होणार!

jalgaon manpa ayukt
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
June 16, 2022 | 4:52 pm

मनपा आयुक्तांच्या सूचना : फिस्ट फाऊंडेशन, इनरव्हील क्लबचे निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । शहरात नवीन रस्ते तयार करण्याची कामे गेल्या अनेक वर्षापासून झालेली नव्हती. त्यातच अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची पार वाट लागली. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अपघातात काहींना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे दुखणे जडले. जळगाव शहरात नुकतेच रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली ही जळगावकरांसाठी चांगली बाब आहे. शहरातील रस्ते तयार करताना डांबरसोबत प्लास्टिकचा देखील उपयोग करावा, अशी मागणी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना करण्यात आली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्यांसाठी पुढील निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिक वापराची अट नमूद करण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या.

जळगाव शहरात डांबरी रस्ते करताना ते गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ होण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार डांबरसोबत प्लास्टिक बिटूमीन्स देखील त्यात वापरावे, अशी मागणी करण्यासाठी मंगळवारी फिस्ट फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ न्यू जेनतर्फे मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची भेट घेतली. प्रसंगी फिस्ट फाऊंडेशनचे सकिना लहरी, चेतन वाणी, कल्पक सांखला, लक्ष्मी सांखला, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा नेहा संघवी, इशिता दोशी, नफिसा लहरी आदी उपस्थित होते.

फिस्ट फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, शहरातील रस्त्यांचे काम करताना ते गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी मक्तेदारावर जबाबदारी करणारे एक परिपत्रक काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे. शहरात आता नव्याने तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाला ते लागू करण्यात यावे. रस्ते किमान पुढील १० वर्ष टिकावे यासाठी आताच कामाच्या निविदेत आवश्यक तो बदल करावा, रस्त्यांची कामे पूर्ण होण्यापूर्वी त्याठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती, ड्रेनेज, इतर केबल संदर्भातील कामे पूर्ण झालेली आहेत की नाही याची खात्री मनपा प्रशासनाकडून करवून घेण्यात यावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा रस्ता खोदकाम करण्याची आवश्यकता भासणार नाही. जळगाव शहर विकासाच्या टप्प्यावर येऊन ठेपले असून शहरात प्रायोगिक तत्वावर एक रस्ता प्लास्टिक वेस्टचा उपयोग करून तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड म्हणाल्या, उदगीर येथे असताना त्यांना प्लास्टिक वेस्टपासून रस्ता तयार करण्याचा उपक्रम राबविला होता. जळगावात देखील असा उपक्रम राबवता येऊ शकतो. पर्यावरण संवर्धनासाठी जळगाव मनपा प्रयत्नशील असून अनेक उपक्रम विविध संस्थांच्या माध्यमातून राबविले जाणार आहे. जळगावात डांबरी रस्त्यांच्या नवीन कामांची निविदा प्रक्रिया राबविताना त्यात प्लास्टिकचा उपयोग करण्याचे नमूद करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी अभियंत्यांना दिल्या. फिस्ट फाऊंडेशनच्या सदस्यांशी पुन्हा भेटत चर्चा करण्याचे देखील मनपा आयुक्त म्हणाल्या.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर, महापालिका
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
dolarkheda

अभयारण्यातील वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांकडे आणखी एक अतिरीक्त चार्ज...

vari vitthal

आषाढी वारी : विठ्ठलाची भक्ती न्यारी, तरुणाईला देखील वेड लावी.. कन्नड घाटात तरुण ८ वर्षापासून करताय वारकऱ्यांची सेवा!

award 1

जनस्थानचे यंदाचे आयकॉन पुरस्कार करंजीकर, रानडे, होळकर यांना जाहीर

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group