तरुणांना रोजगाराची संधी ! १६ मार्चला जळगावात प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन, थेट मुलाखतीतून होणार निवड

मार्च 14, 2026 4:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा १६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंडजवळ, जळगाव येथे पार पडणार आहे.

job

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये छबी इलेक्ट्रिकल्स तसेच सुप्रीम इंडस्ट्रीज लि., जळगाव यांसारख्या नामांकित उद्योगसंस्था सहभागी होणार असून विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

ड्रिपलाईन मशीन ऑपरेटर, एचडीपीई लाईन इंजिनिअर, मेंटेनन्स इंजिनिअर, रॉ मटेरियल स्टोअर मॅनेजर, अकाउंट ऑफिसर, क्वालिटी टेक्निशियन, प्रोडक्शन इंजिनिअर, लॉजिस्टिक अँड अकाउंट असिस्टंट, स्टोअर/परचेस इंजिनिअर आदी पदांसाठी संधी उपलब्ध आहेत. यासाठी बी.कॉम, एम.कॉम, बीएस्सी (फिजिक्स), बी.ई., डिप्लोमा, एमबीए (फायनान्स) अशा शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार पात्र राहतील.

इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून उपलब्ध रिक्त पदांसाठी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली नाही त्यांनीही सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now