बोदवडमध्ये लहान मुलांच्या भांडणातून मोठा राडा; मारहाणीत एकाच मृत्यू

मार्च 21, 2026 10:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात लहान मुलांच्या भांडणातून उद्भवलेल्या वादाने गंभीर वळण घेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हनुमाननगर परिसरात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुनील श्यामराव दैवे (४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

jalgaon mahanagar palika 47 jpg webp

काय आहेत घटना?

काही दिवसांपूर्वी लहान मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून मोठ्यांमध्ये भांडण झाले होते. या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. यात सुनील दैवे आणि रवींद्र दैवे यांना पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. सुनील दैवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहरात प्रभाग क्रमांक पाच तसेच मृतकाच्या घरासमोर मोठा जमाव जमला होता. यातून तणाव निर्माण झाला होता. या घटनेतील संशयित प्रेम गंगातिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर हत्येचे वाढीव कलम लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. दरम्यान, जळगावहून सुनील दैवे यांचे पार्थिव आणण्यात आल्यानंतर परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. शोकाकुल वातावरणात सुनील दैवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक दीपक सुरवडकर यांनी घटनास्थळी येऊन आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, प्रकरणात वाढीव कलमेही लावण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories