पेट्रोल-डिझेलमध्ये कंपन्यांना पुन्हा दिलासा! जाणून घ्या तुमच्या शरहातील आजचे नवीनतम दर??

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२२ । कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) जुन्या पातळीवर कायम आहे. अनेक दिवसांपासून तेलाच्या किमतीत बदल न झाल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, महागाई दर हा चिंतेचा विषय आहे. गेल्या काही दिवशी क्रूडच्या किमती विक्रमी पातळीवर गेल्यानंतर ओपेक देशांनी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भावात सातत्याने वाढ होत राहिली.

देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळापासून जैसे थे राहिले आहे. आज गुरुवारी सकाळी WTI क्रूड प्रति बॅरल $89 आणि ब्रेंट क्रूड $95.36 प्रति बॅरलवर पोहोचले. मात्र, याआधी 1 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 40 पैशांची कपात होणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही. कंपन्या तेलात लिटरमागे 2 रुपयांपर्यंत कपात करतील अशीही बातमी होती, पण त्याची अंमलबजावणी अनेक टप्प्यांत केली जाईल.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये क्रूड विक्रमी पातळीवर घसरले, पण त्यावेळीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला दिसला नाही. तेलाच्या किंमतीतील शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारने 22 मे रोजी उत्पादन शुल्क कमी केले होते. त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला, त्यामुळे किंमती खाली आल्या.

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
अहमदनगर १०६.६४ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.१५, डिझेल (प्रति लिटर )
अकोला १०६.३७ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.९१, डिझेल (प्रति लिटर )
अमरावती १०७.४४ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.९४, डिझेल (प्रति लिटर )
औरंगाबाद १०६.४२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.९३, डिझेल (प्रति लिटर )
भंडारा १०७.०१ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.५३, डिझेल (प्रति लिटर )
बीड १०७.९६ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.४२ ,डिझेल (प्रति लिटर )
बुलढाणा १०६.९६ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४८ डिझेल (प्रति लिटर )
चंद्रपूर १०६.१२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.६८ डिझेल (प्रति लिटर )
धुळे १०६.१३ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.६६ डिझेल (प्रति लिटर )
गडचिरोली १०६.९२ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४५ डिझेल (प्रति लिटर )
गोंदिया १०७.५३ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.०२ डिझेल (प्रति लिटर )
हिंगोली १०७.०६ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.५८ डिझेल (प्रति लिटर )
जळगाव १०६.४२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.९४ डिझेल (प्रति लिटर )
जालना १०७.९१ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.३६ डिझेल (प्रति लिटर )
कोल्हापूर १०७.४५ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.९४ डिझेल (प्रति लिटर )
लातूर १०७.२५ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.७४ डिझेल (प्रति लिटर )
मुंबई शहर १०६.३१ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.२७ डिझेल (प्रति लिटर )
नागपूर १०६.०४ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.५९ डिझेल (प्रति लिटर )
नांदेड १०७.८४ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.३३ डिझेल (प्रति लिटर )
नंदुरबार १०७.२२ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.७१ डिझेल (प्रति लिटर )
नाशिक १०६.५१ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.०२ डिझेल (प्रति लिटर )
उस्मानाबाद १०६.९२ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४३ डिझेल (प्रति लिटर )
पालघर १०६.०२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.५१ डिझेल (प्रति लिटर )
परभणी १०८.५० पेट्रोल (प्रति लिटर) ९४.९३ डिझेल (प्रति लिटर )
पुणे १०६.२२ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.७३ डिझेल (प्रति लिटर )
रायगड १०५.७७ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.२८ डिझेल (प्रति लिटर )
रत्नागिरी १०७.६५ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.१४ डिझेल (प्रति लिटर )
सांगली १०६.०५ पेट्रोल (प्रति लिटर) ९२.६० डिझेल (प्रति लिटर )
सातारा १०६.७६ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.२८ डिझेल (प्रति लिटर )
सिंधुदुर्ग १०७.९७ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.४५ डिझेल (प्रति लिटर )
सोलापूर १०६.७७ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.२९ डिझेल (प्रति लिटर )
ठाणे १०६.३८ पेट्रोल (प्रति लिटर) ९४.३४ डिझेल (प्रति लिटर )
वर्धा १०६.५३ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.०६ डिझेल (प्रति लिटर )
वाशिम १०६.९५ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.४७ डिझेल (प्रति लिटर )
यवतमाळ १०७.३९ पेट्रोल (प्रति लिटर) ९३.८९ डिझेल (प्रति लिटर )