जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । सरकारी तेल कंपन्यांनी आज (24 जुलै) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील दिलासा कायम ठेवला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. आज जाहीर झालेल्या दरानुसार जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे. Petrol Diesel Rate Today

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत राहिल्यास राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वेळी केंद्रातील मोदी सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

महाराष्ट्र सरकारने दिलासा दिला
केंद्र सरकारच्या घोषणेनंतर अनेक राज्यांतील सरकारांनी व्हॅट कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. त्यात राजस्थान आणि झारखंडचा समावेश आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांचा दिलासा दिला होता. याशिवाय दोन महिन्यांपासून दर त्याच ठिकाणी आहेत. यामध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. सरकारने 21 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती.
नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.












