⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

कच्चे तेल शतकाजवळ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? काय आहे आज तुमच्या शहरातील दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा वाढू लागले आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. यानंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. आज सलग ८४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही Petrol Diesel Rate Today

आज जाहीर झालेल्या दरानुसार जळगावमध्ये पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे.

महाराष्ट्रातील दर?
नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.

तुमच्या शहराची किंमत माहीत आहे का?

दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
नोएडामध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर
तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर
पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर
हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

इथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते
देशभरात महागाई गगनाला भिडत असताना पोर्ट ब्लेअरमध्ये स्वस्तात पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.