⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर! आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त, जळगावात आता एका लिटरचा दर किती?

खुशखबर! आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त, जळगावात आता एका लिटरचा दर किती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 15 मार्च 2024 | सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर 2 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, केंद्र सरकारने गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करण्याची घोषणा केली. नवीन दर आज म्हणजेच १५ मार्चपासून लागू झाले. पेट्रोल-डिझेल दरकपातीमुळे देशातील ५८ लाखांहून अधिक मालवाहतूकदारांसह ६ कोटी कार आणि २७ कोटी दुचाकीस्वारांना फायदा होईल. तसेच देशातील महागाई कमी होण्यास मदत होईल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे

दरम्यान, जळगावमध्ये गुरुवारी पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०७.६४ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९४.११ रुपये होता. आज शुक्रवारपासून दोन्ही इंधनात प्रत्येक दोन रुपये कपात झाल्यामुळे पेट्रोलचा नवा दर १०५.६४ रुपये तर डिझेल ९२.११ रुपये प्रतिलिटर होऊ शकते. यात थोडा फार फरक येऊ शकतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.