विरोधकांच्या टीकेला विकास कामांनी उत्तर देणार; मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । आज पष्टाणे या गावातील भाजप व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले.
टीकेला कामाने उत्तर देऊ माझ्यावर किती टीका होत आहे यावर मी लक्ष देत नाही. आपण आपले काम करत राहायचे. आता निवडणुका जवळ येतील तेव्हा यापेक्षा जास्त टीका माझ्यावर होईल त्यामुळे टीकेला उत्तर देण्यापेक्षा कामाने उत्तर देऊ हे मी या ठिकाणी ठरवलेले असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
या कार्यकर्त्यांनी केला प्रवेश
पष्टाणे गावातील गणेश देसले,नितीन जाधव, निलेश ठाकरे, शरद जाधव, सुनील जाधव, राहुल पाटील, विजय शिंपी, गणेश ठाकरे, रितेश जाधव, केतन ठाकरे, यशवंत ठाकरे,त्याच बरोबर पंचायत समितीचे सभापती प्रेमराज पाटील, संजय पाटील सर, मुकुंदजी नन्नवरे, तसेच पष्टाणे येथील मा.ग्रा.पं.सदस्य शिवसेना शाखा प्रमुख संजय ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मा.सरपंच किशोर निकम त्याचबरोबर आदी उपस्थित होते