⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

संतापजनक! अज्ञाताने मेहरूण तलाव परिसरातील बाकडे तोडली, वृक्षांवर चालवली कुऱ्हाड

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । मेहरूण तलाव परिसरात सुशोभीकरणासाठी रमेश पहेलानी म्युझिकल ग्रुप व मराठी प्रतिष्ठान तर्फे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले तसेच सिमेंटचे चार नवीन बाक ठेवण्यात आले आहे. तलाव परिसरात मॉर्निंग ईव्हीनिग वॉक ला येणारे नागरीक वयोवृद्ध, महिला, मुली, विद्यार्थी या ठिकाणी बसतात. मात्र, सोमवारी अज्ञात विकृत मानसीकता असणाऱ्या उपद्रवी समजकंटाकांनी भला मोठा दगड टाकून हे बाक तोडले आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतापजनक म्हणजे, या ठिकाणी झाडांची साल काढणे, वृक्ष तोड करणे, दारू पिऊन बाटल्या फोडणे, घाण पसरविणे असे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

जळगाव शहर महानगरपालिका, गांधी रिसर्च फाउंडेशन,जैन उद्योग समूह, केशव स्मृती समूह,इंडियन रेडक्रॉस सोसायटी,रोटरी क्लब,लायन्स क्लब,मराठी प्रतिष्ठान,कृती फाउंडेशन,रमेश पैलानी कराओके ग्रुप,पर्यावरण,निसर्ग प्रेमी तसेच अनेक सामाजिक संस्था सुजाण नागरिक नेहमीच अग्रेसर असून मेहरूण तलाव परिसरात सुशोभीकरणासाठी रमेश पहेलानी म्युझिकल ग्रुप, मराठी प्रतिष्ठान तर्फे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले होते तसेच सिमेंटचे चार नवीन बाक ठेवले होते. तलाव परिसरात मॉर्निंग ईव्हीनिग वॉक ला येणारे नागरीक वयोवृद्ध, महिला ,मुली, विद्यार्थी त्या ठिकाणी बसतात. मात्र, अज्ञात विकृत मानसीकता असणाऱ्या उपद्रवी समजकंटाकांनी भला मोठा दगड टाकून हे बाक तोडले आहेत. तलाव परिसर म्हणजे मद्यप्राशन करणाऱ्या तसेच उपद्रवी लोकांची सुरक्षित जागा झाली आहे.

आज सकाळी पैलानी कराओके गृप, मराठी प्रतिष्ठान, कृती फाउंडेशन, तसेच नागरिकांनी याठिकाणी उपस्थित राहून तोडलेले वृक्ष आणि बाकाला माल्यार्पण केले, फुले वाहून दोन मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पित केली. तसेच पैलानी म्यूजीकल गृप तर्फे ‘देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान’ या गाण्याच्या माध्यमातून विकृत मानसिकतेचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला तसेच या कृत्याचा निषेध करण्यात आला. यावेळी रमेश पैलानी, गौरव मेहता, अशोक भावसार, विजय चौधरी,सुभाष मिस्तरी,भिकन तिजारे, प्रकाश बोरसे,रफिक पिंजारी, मयूर वाघ, अमित माळी,पैलानी म्युझिकल ग्रुपचे सदस्य तसेच नागरीक उपस्थित होते.